30 Aug 2009

कविराज भूषण - भाग १७ - महीपर कीरति श्री सिवराज बगारी ... !

छाय रही जितही तितही अतिहि छबि छीरधि रंग करारी ।

भूषन सुद्ध सुधान के सौधनि सोधति सी धरि ओप उज्जारी ।

योंतम तोमहि चाबिकै चंद चहूं दिसी चाँदनि चारू पसारी ।

ज्यों अफजल्लहि मारि महीपर, कीरति श्री सिवराज बगारी ॥

... कविराज भूषण

भाषांतर :

ज्या प्रमाणे क्षीर समुद्रात जिकडे दृष्टी फेकावी तिकडे शुभ्रच शुभ्र छबि पसरलेली दिसते किंवा चंद्राने अंधकारास ग्रासून शुभ्र चांदणे पसरावे व त्या प्रकाशात शुभ्र चुने गच्ची प्रासादांची जशी सुंदर शोभा दिसावी त्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी अफजलखानास मारून पृथ्वीवर आपली उज्वल कीर्ति पसरवली.

1 comment:

  1. नोंद : माझ्या ब्लॉगवर कविराज भूषण यांची सर्व काव्ये व भाषांतरे लिहून काढ़ण्याचे पूर्ण श्रेय माझा मित्र ओंकार याचे आहे.

    ReplyDelete