पण सध्या ह्या ओळींचा दुरुपयोग करून शिवाजी महाराज ब्राह्मण विरोधी होते असा आरडा ओरडा केला जातोय. जर ते ब्राह्मण विरोधी असते तर त्यांनी त्यांच्या अष्टप्रधानात आणि कार्यात ब्राह्मणांना स्थान दिले असते का? स्वतः:ची वाक्ये राजांच्या तोंडात कोंबून ब्रिगेडी लोक अप्रत्यक्षपणे नव्हे तर आता थेट प्रत्यक्षपणे राजांचा अपमान करीत आहेत... जे लोक राजांबरोबर फक्त राजकारणात नाही तर युद्धात देखील खांद्याला खांदा लावून लढले त्यांच्याविरुद्ध हा मुर्खासारखा अपप्रचार सुरू केला आहे. हे थेट राजांच्या राज्यकार्याचा आणि युद्धनितीचा अपमानच आहे. ह्याचा निषेध करावा तितका कमीच.
'शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?' हे पुस्तक जेंव्हा माझ्या वाचनात आले तेंव्हा त्यावरील मुखपृष्ठ (शिवाजीराजे कृष्णाजी भास्करला मारताना) आणि 'ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो' या खालील ओळींनी विचारचक्र सुरू केले. राजांनी हे एका पत्रात लिहिले आहे खरे पण ते कृष्णाजी भास्करला नव्हे. कुठल्याही एका जातीची मक्तेदारी समाजावर नसून हे श्रींचे राज्य अशी धारणा राजांची होती. हे वाक्य राजांनी ज्या पत्रात वापरले आहे ते संपूर्ण पत्र मी येथे देत आहे. ह्यावरून समजून येईल की चुकीचे वाक्य चुकीच्या ठिकाणी वापरून लोकांची कशी दिशाभूल केली जात आहे...
शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी १८ जानेवारी १६७५ रोजी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात,"ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?"
********************************************************************************
मशहुरुल हजरत राजश्री जिवाजी विनायक सुभेदार व कारकून सुभे मामले प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे दंडवत. सुहुरसन खमस सबैर व अलफ. दौलतखान व दरिया सारंग यांसी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे यांणी वराता सुभे मजकुरावरी दिधल्या. त्यांस तुम्ही काही पावविले नाही म्हणोन कळो आले. त्यावरून अजब वाटले की ऐसे नादान थोडे असतील! तुम्हास समजले असेल की याला ऐवज कोठेतरी देवविला पाहिजे. तो न पावविता ऐवज खजाना रसद पाठीविलीया माजरा होईल म्हणत असाल. तरी पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान पावावे. या कामास आरमार बेगीने पावावे. ते होत नाही तर पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील. आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल. त्यावरी साहेब (शिवाजी राजे) रीझतील की काय? ही गोष्ट घडायची तरी होय, न काळे की हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हास केले असतील! त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल! तरी ऐश्या चाकरास ठिकेठिक केली पाहिजेत. ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो? या उपरी त्याला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत देविला असे तो देवितील. तो खजाना रसद पाविलीयाहून अधिक तेणेप्रमाणे आदा करणे की जे तुमची फिर्याद न करीत व त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन पद्मदुर्गाच्या मदतीस राहात ते करणे. या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.
रवाना छ २ जिल्काद.
********************************************************************************
तर हे १८ जानेवारी १६७५ रोजी लिहिलेले पत्र १६ वर्षे आधी घडलेल्या 'कृष्णाजी भास्कर' बरोबर जोडून अपप्रचार आणि गैरसमज पसरविला जात आहे... हे आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणार आहोत का???
अप्रतिम !! एकदम योग्य वेळी योग्य संदर्भ दिला आहेस.. ! अर्थाचा अनर्थ करणारे हे लोक कधी सुधारतील देवच जाणे..
ReplyDelete'शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण' चा लेखक (!!) असलेल्या त्या कोकाट्याला आम्ही आमच्या याहूग्रुपवर इतका धुतला होता की त्याला पळताभुई थोडी झाली होती !!
सेनापती...अगदी योग्य वेळेस संदर्भ दिला आहे...कारण ही संधी साधु लोक फ़क्त त्यांना हवा असलेला अर्थ लावुन विनाकारण गैरसमज पसरवत असतात.
ReplyDeleteमी पण ते पुस्तक वाचलय काही पण लिहलय.च्यायला कोणी उठतय अन स्वतःला संशोधक म्हणतय.
माझा अजिबात अभ्यास नाही, इतीहासाचा, पण तुझा लेख वाचून बरंच काही समजलं. तसेच मेल मधे पाठवलेली माहीती पण खूपच कामाची आहे.
ReplyDeleteनक्षलवादाला खतपाणी घालणारे मुजुमदार आणि या लोकांना सपोर्ट करणारे कॉंग्रेस/ राष्ट्रवादी सरकार एकाच माळेचे मणी. आज जसे नक्षलवादी त्यांच्या ’आकाच्या’ हातून पुर्णपणे निघून गेला आहे,तसेच काहीसे होण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही.
योग्य वेळी अगदी सार्थ संदर्भ दिला आहेस मित्रा. माझ्याकडे आहे ते पुस्तक, माझा त्या लेखकाबरोबर सॉलीड पत्रव्यवहारही झालाय. बघु जमेल तसे स्कॅन करुन टाकेन एकेक मुक्ताफ़ळे त्याची.
ReplyDeleteमस्त लेख, आवडला :)
आपल्या घरातील लोकांनाच राजांचे थोर पण कळले नाही मग त्या फडतूस लेन ला काय कळणार.....कोणीही उठून स्वतःला इतिहास कार म्हणवू लागलेत त्याचा हा परिणाम
ReplyDeleteधन्यवाद !!!!
ReplyDeleteअभ्यासपूर्ण post बद्दल धन्यवाद ...............
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे.त्यांनी कधीही जातीभेद न करता हे स्वराज्य मराठी आणि ब्राह्मण असा निरर्थक वाद रंगवून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तो पेटवून सतत धुमसत ठेवण्यासाठी केविलवाणी धडपड करणारी हि ब्रिगेडी मंडळी यातून काहीतरी बोध घेतील का ?
जय भवानी !!!! जय शिवराय !!!!
!!!! जय महाराष्ट्र !!!!
The book written by Kokate at some places diverges from the core topic and gets carried away by personal emotions. But it is a noticeable fact that majority of his claims have nothing new to offer. They are obvious, well discussed and well approved by many scholars at factual level, perceptions may differ. Be it the case of Krisha Bhaskar or be it of the problems posed by brahmins over Shivaji's caste during 'rajyabhishek' or be it the politics of 'ashtapradhan' peshava ministry, or the doubts about Ramdas ever meeting Shivaji, and so on.. these are all well known issues and many great historians and philosophers have tried to make a meaning out of them. The fact remains that Shivaji was a true secular ruler who did not believe in caste or religious fundamentalism and fought for the just society where everyone could prosper. Every aspect of Mughal brutalities including their administration run by muslims, brahmins and other elites were his targets. He had brahmins, muslims and even untouchables on his side. Obviously he had to face resistance from within the society as well which was primarily based on caste, the task that he did commendably. So there is no question of projecting Shivaji against any particular caste. The motive of the research should have been to focus on the social revolutionary and transformational aspects of Shivaji's struggle which have been marginalized by anti-social elements by narrowing down Shivaji to a mere hindu military force against muslims so that they can carry out their own politics of hate, violence and religion in the name of Shivaji. So far, attempts have been made to project him either as pro-hindu, or anti-muslim, or pro-brahmin and now even anti-brahmin, the same crime that is done against both Ambedkar and Gandhi. We need to understand that these people were well above caste and religious narrow-mindedness. We need to understand that Shivaji's motive of swaraj was not merely an owned empire but a society void of any discrimination be it caste, religion, crime or political corruption, all of which had prevailed in the Mughal rule and all of which reappeared since peshva rule. There have been great fighters and emperors across the world, but it is the vision and philosophical maturity of Shivaji that differentiates him.
ReplyDeleteजे जे चूकले त्यांना भवानीचा तडाखा बसला. मग तो अफझल - शास्ताखान असो, कृष्णाजी भास्कर असो किंवा मोरे - घोरपडे ..... त्यात जात - धर्म महाराजांनी कधीच बघितला नाही. इतके समजुन घेतले तरी महाराष्ट्राचे भले होईल
ReplyDeleteयोग्य वेळी योग्य संदर्भ दिलात..मागिल आठवड्यात झी२४ तास वरील रोखठोक मधे तथाकथित इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांची अनेक प्रश्नांना उत्तर देताना बोबडी वळली होती...कुठल्याही कोनातुन अंशातुन पाहिले तरि तो संशोधक इतिहासकार तत्सम वाटत नाही..असले गल्लाभरू इतिहास संशोधक नव्याने निर्माण झालेत याचे श्रेय कुणाला द्यायचेच असेल तर ते बारामतीच्या स्वयंघोषित जाणत्या राजाला...या कोकाट्याने थोबाड उचकटले कि त्याची विद्वत्ता आणि इतिहासाची किती माहिती असेल ते लगेच उमजते...असल्यांना फाट्यावर मारणेच योग्य....यांचे पितलिखाण वाचून सुज्ञाने पापाचे धनी होवू नये....छ्त्रपतींना फक्त मराठ्यांच्या दावणीला बांधण्याचा निव्वळ अट्टाहास आहे....कोकाटेसारखे नव-इतिहासकार फक्त खेटराने हाणण्याच्याच लायकीचे आहेत..
ReplyDeleteद्विजाची कैफियत
ReplyDeleteहल्ली मी दहशत वाद्यांच्या विरोधात बोलायचे टाळतो,
कारण बुरसटलेली विचारसरणी अशी हेटाळणी होईल
हल्ली मी आंदोलनात भाग घ्यायचे टाळतो,
कारण आंदोलनाचा पाठिंबा कमी होईल
हल्ली मी आरक्षणावर बोलायचे टाळतो,
कारण राजकारणी त्याचा फायदा घेतील
हल्ली मी समाजसुधारकांचे नाव ही घ्यायचे टाळतो,
कारण खोटा इतिहास सांगण्याचा खटला होईल
हल्ली मी टिळक, सावरकरांचे लिखाण वाचणे टाळतो,
कारण सनातनी विचारांचा शिक्का बसून जाईल
हल्ली मी सभ्य, सुसंस्कृत पणे बोलणे टाळतो,
कारण त्याला नपुंसकता समजले जाईल
हल्ली मी समाजसेवा करण्याचे टाळतो
कारण त्यातच आमच्या घरांची बरबादी, कुटुंबांची ससेहोलपट झाली
हल्ली मी आडनाव घ्यायचे टाळतो,
कारण त्यातून माझी जात ओळखली जाईल
हल्ली मी चारचौघात विचार मांडणे टाळतो,
कारण त्यात कुणालाही जातीय कावा दिसतो
हल्ली मी देशभक्तीच्या घोषणा देणे टाळतो,
कारण त्यात संघाचा प्रभाव दिसतो
नाही दादोजींना इमान, रामदासांना चारित्र्य,
शहिदांची जात येते वृत्तपत्रात मात्र
हळू बोला,आपल्या जातीचे नाव कुणी घेवू नका,
कृष्णाजीशिवाय कोणाचाही वारसदार स्वतःला मानू नका
आम्हाला शिव्या दिल्या शिवाय इतर मागासलेले ठरत नाहीत,
रात्री पुतळे हलवल्याशिवाय भ्रष्टाचारावरून जनतेचे चित्त हटत नाही
ही जात इतकी बदनाम कशी,प्रश्न मला पडला आहे,
जातीयतेच्या राजकारणात सारा देश सारा देश सडला आहे
जरी म्हटलं या साऱ्या अफवा खोट्या आहेत,
पण विषमता मिटली तरी आमच्या मनात मोठ्या दऱ्या आहेत
आमचा जप करून पोट काहींचे भरते यात आनंद आहे,
शेवटी त्यांच्या कडेही द्यायला शिव्या उरत नाहीत
आतातर यासाठी विशेष धर्म, संघटना निघाल्या आहेत,
भावी देशासाठी त्यांच्या आपापल्या घटना निघाल्या आहेत
त्यांच्या या घटनांमध्ये एका जातीला स्थान नाही,
म्हणून तिथे कवी कलशाला उल्लेखाचा ही मान नाही
काय करणार शेवटी ही जातच बदनाम आहे,
मान वर करून चालण्याची आमची काय बिशाद आहे
धर्म तोडणार्यांना, सत्ताधीशांना आगीत तेल ओतावे लागते,
त्यांच्या कडेही दुसरा फायद्याचा उपाय नाही
वाघ, सिंहाच्या वाटेला कुणी भक्त जातो काय,
यज्ञात बळी होतो बकरा, राजकारणात कोण होते पाहा,
धरली तर चावते, सोडली तर पळते अशी ही जात आहे,
ही तर कट्टरतेची माणुसकी वर मात आहे
स्वातंत्र्यानंतरही घरे जळाल्यावर आम्ही मागे हटलो आहोत,
समाजसेवा,परमार्थ करण्याला घाबरू लागलो आहोत
सोडा आता विचार सारे, पूर्वजांच्या चुका पुन्हा करू नका,
अहंगंडाच्या कोशात राहून वाट वाकडी धरू नका
जिभेवर असली सरस्वती तरी सत्य बोलावत नाही,
मानाने जगण्याचा हक्क ही आम्ही मागत नाही
आम्हाला आदर न दिल्याने समाज कुठे चालला आहे,
शिक्षणात पावित्र्य, समाजात नैतिकता, राजकारणात सौजन्याची ऐशी तैशी,
जीवनात रामापेक्षा दामाची जागा झाली मोठी
द्वेषाला द्वेषाने आम्ही उत्तर देत नाही,
द्वेषाचा धंदा करणार्यांचे दुकान बंद होत नाही
वोट बँक बनवल्याशिवाय प्रश्न कधी सुटणार नाहीत,
पैसा, सत्ता आल्याशिवाय समाजाला तुम्ही चांगले वाटणार नाहीत
शेंडी आणि जानव्याची ताकद अजून कमी झालेली नाही,
हार मानण्याइतकी परिस्थिती हाताबाहेर गेली नाही
सोडून सारे न्यूनगंड,हताशा, वर्तमानात जगूया,
गेली संकटे, झाल्या चुका, बदलण्याची वेळ आहे.
हिम्मतीने जगण्याचा हा काळ आहे.
उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे,
यश खेचून आणायचे आहे
होऊन गेला भूतकाळ, भविष्य बाकी आहे,
द्वेष कुणीही करो, राम आमच्या पाठीशी आहे
- कवी योगेश