21 Oct 2009

छत्रपति शिवराय - इंग्रजी मधून ... !

छत्रपति शिवराय आणि मराठा इतिहासावर मराठी भाषेमधून बरीच उत्तम पुस्तके उपलब्ध आहेत. पण त्याचा वाचक वर्ग मराठी भाषेपुरता सिमीत आहे. संपूर्ण भारतात तसेच इतर देशात त्यांच्याबद्दल विविध भाषांमध्ये अधिक माहिती पोचावी म्हणुन तसे फारसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत.

'सेतु माधवराव पगडी' यांनी 'छत्रपति शिवाजी महाराज' या इंग्रजी भाषेतून लिहिलेल्या पुस्तकातून त्यांनी ह्या जाणत्या राजाचे चरित्र अतिशय उत्तमरित्या शब्दबद्ध केले आहे. ह्या पुस्तकावर आधारीत एक छोटेखानी लिखाण मी मागे संकलित केले होते. शिवजन्मापासून त्यांच्या महानिर्वाणापर्यंत एकुण ३३ मुद्यांवर सदर लिखाण आधारित आहे. ते लिखाण येथे वाचू शकता.




आज आपल्या प्रत्येकाच्या कार्यालयात अनेक बिगर मराठी सहकारी असतात. शिवरायांबद्दल इंग्रजी भाषेमधील सदर लिखाण त्यांना वाचायला दिल्यास शिवचरित्र त्यांना अधिक चांगल्या रितीने उमजू शकेल.

4 comments:

  1. सालाबाद प्रमाणेच :) चांगली माहिती. वरील छायाचित्र छान आहे. कुठले आहे ते ?

    वन्दे शिवराय च्या ऐवजी वन्दे शिवरायम् जास्त योग्य असे मला वाटते.

    ReplyDelete
  2. धन्यवाद मृदुला ... छायाचित्र पिंपरी-चिंचवड येथील एका स्मारकाचे आहे.

    ReplyDelete
  3. setu Madhawrao pagdi yanchi pustake pramanik etihas saushodhanavar adharit aslyane ranjak itihas lihinaryani ek shadyantradware bajaratun gayab kele ahet etar marathi pustake kuthe milat aslyas sanga !

    ReplyDelete
  4. you will often get them in majestic & ideal book shops in mumbai.. In pune available in bharat Itihas Mandal & online @ www.sahyadribooks.org

    ReplyDelete