ते कुशल सेनानी होते, युद्धतज्ञ होते. या खेरीज ते मुलकी कारभाराचे तज्ञ होते. प्रजेच्या ईहलौकिक कल्याणाची जबाबदारी आपली आहे, हे त्यांना पुरेपुर माहीत होते. प्रजेवर निरर्थक कर त्यांनी कधी लादले नाहीत. (सिंहासनपट्टी हा जादा कर सुद्धा त्यांनी वतनदारांवर लावला.) 'मी शत्रूंना दगा दिला, पण मित्रांना दगा दिल्याचे एक तरी उदहारण दाखवा' असे जाहिर आव्हान त्यांनी दिले होते. त्या आव्हानाला आजतागायत उत्तर आलेले नाही. कौल देऊन गावे बसवणे, बीघे-चावर जमीन मोजणे, जमीन लागवडीखाली आणणे, बी-बियाणे - नांगर-बैल यासाठी कर्ज देणे, शेतसारा निश्चित करणे असे विधायक उपक्रमही त्यांनी केले. त्यांच्या काळात उत्पन्नाच्या ४० टक्के कर होता. आजही हा कर लहान नाही. तरी सुद्धा लोकांनी २/५ ही वाटणी आनंदाने स्विकारली. कारण कर दिल्यावर पक्षपात न होता संपूर्ण संरक्षण आणि न्याय याचे आश्वासन मिळायचे. 'पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी' हे त्यांच्या राजवटीचे एक गमक आहे. कारण त्यांनी हक्क वतनदारांकडे न ठेवता स्वतःकडे घेतले.
भाषा सुधारण्यासाठी 'राज्यव्यवहार कोश', पंचांग सुधारण्यासाठी 'करण-कौस्तुभ', धर्मात शुद्ध करून घेणे हे सुद्धा त्यांनी केले. स्त्रीची अब्रू निर्धोक केली. त्यासाठी स्वतःचा निष्ठावान सरदार सखोजी गायकवाड ह्याचे हातपाय तोडण्यास कमी केले नाही. फौजेला शिस्त लवली. गावातून काही फुकट घेऊ नये असा दंडक केला. आपल्या फौजेतल्या ३०० लोकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडले. कारण बळकटपणे तलवारी हातात घेणारे हात ह्यापेक्षा शासनामागे उभा राहणारा जनतेचा हात त्यांना जास्त महत्वाचा होता. 'मुलकी सत्ता ही लश्करी सत्तेपेक्षा श्रेष्ठ असली पाहिजे' हे सांगणारा आणि त्यावर वाटचाल करणारा असा माणूस भारताच्या इतिहासात एकमेव आहे. म्हणुनच तर समर्थ त्यांना 'शिवकल्याण राजा' म्हणतात.
स्त्रियांचे व गुलामांचे आठवडी विक्री बाजार त्यांनी बंद करवले. तर विरोधकांच्या धर्मग्रंथांचा व पूजास्थानांचा त्यांनी सदैव आदर केला. अतिशय संयमी आदर्श गृहस्थजीवन ते जगले. निर्दोष व सुखी राज्यकारभार केला. स्वतः शुन्यातून राज्य निर्मिती करून हे 'श्रींचे राज्य' आहे अशीच त्यांची वागणूक राहिली. म्हणुन तर ते श्रीमंत योगी झाले.
त्यांच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे आपला आत्मविश्वास जागा करणाऱ्या एका युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास असतो.
.... वंदे शिवराय .... !!!
.
.
Hi Rohan,
ReplyDeleteChan mahiti dlili aahes .... vachun anand jhala
Thnx neal ... I will try to continue to give more & more Such information ... !
ReplyDeleteSHREE ROHAN Sir tumchya likhanachi mi chatak pashya pramane vaat pahat aasto te hi khaas karun shivaji maharaj yanchya varil lekha mala far aavadtat karan raje majysathi parampujya bhagvaan aahet.kurpaya tumi roj lihit ja.....
ReplyDeleteमित्रा संग्राम ... तूला माझे लिखाण (खरेतर थोर लेखकांच्या आणि इतिहासकारांचे लिखाणाचे संकलन आहे ते) आवडते त्याबद्दल आभार. पण जसे आणि जितके जमते तसे जास्तीत जास्त लिहीण्याचा मी प्रयत्न करतो... :)
ReplyDeleteपुढील लिखाण लवकरच करीन ... धन्यवाद ... !
Thanks dear for providing such a beautiful & great information.
ReplyDeleteKishore
Jabardast !! kharokhar manapasun iccha ahe & khari garaj ahe apalya lokana (ani jagalahi) khare shivaji maharaj dakhavinyache. khup changla prayatn ahe tuza. abhinandan.
ReplyDeletevat pahatoy tuzya pudhachya blog chi.
Sahyadri var ekhada granth suchav.
रायगडावर तुम्ही उभारली स्वराज्याची गुढी
ReplyDeleteतुम्ही नसते राजे तर सडली असती म्हडी
तुम्हा कारणे आम्ही पाहतो मंदिरांचे कळस
तुम्ही नसते राजे तर नसती अंगणी तुळस