20 Jan 2010

शिवराज्यातले 'बारा महाल' आणि 'अठरा कारखाने' ... !

छत्रपति शिवरायांच्या काळात राज्य शासनाच्या महत्वाच्या कामासाठी विविध विभाग पाडण्यात आले होते. यात 'कारखाने' आणि 'महाल' असे २ प्रमुख भाग होते. कारखाने म्हणजे 'कार्यस्थाने' तर महाल म्हणजे 'विविध भांडारे'. सभासद बखरीत एकुण बारा महाल आणि अठरा कारखाने यांचे उल्लेख आले आहेत. ह्यात बरीच खाती समाविष्ट नाहीत. अर्थात जी अधिक महत्वाची ती स्वतंत्रपणे नोंदली गेली असतील.

बारा महाल आणि अठरा कारखाने खालीलप्रमाणे ... (कंसातील नावे 'राजव्यवहारकोश' यामधून घेतली आहेत)

  • बारा महाल
१) पोते (कोशागार)

२) थट्टी (गोशाळा)

३) शेरी (आरामशाळा)

४) वहिली (रथशाळा)

५) कोठी (धान्यागार)

६) सौदागीर

७) टकसाल (मुद्राशाळा)

८) दरुनी (अंत:पुर)

९) पागा (अश्वशाळा)

१०) ईमारत (शिल्पशाळा)

११) पालखी (शिबिका)

१२) छबिना (रात्रिरक्षणं)

  • अठरा कारखाने
१) खजिना (कोशागारं खजाना स्यात)

२) जव्हाहिरखाना (रत्नशाळा)

३) अंबरखाना (धान्यशाळा)

४) आबदारखाना (जलस्थानम)

५) नगारखाना (आनकस्तु नगारास्यात)

६) तालीमखाना (बलशिक्षा तु तालीमं)

७) जामदारखाना (वनसागर)

८) जिरातेखाना (शस्त्रागार)

९) मुदबखखाना (पाकालयम)

१०) शरबतखाना (पानकादिस्थानम)

११) शिकारखाना (पक्षिशाळा)

१२) दारूखाना (अग्न्यस्त्र संग्रह)

१३) शहतखाना (आरोग्यगृह)

१४) पीलखाना (हत्तीगृह)

१५) फरासखाना (अस्तरणागार)

१६) उश्टरखाना (उंटशाळा)

१७) तोपखाना (यंत्रशाळा)

१८) दप्तरखाना (लेखनशाळा)
 
बारा महाल आणि अठरा कारखाने यांच्या मधल्या प्रत्येकावर एक अधिकारी नेमलेला होता आणि त्याने 'खाजगीच्या इतल्यात' म्हणजे 'Under Information' राहावे असे स्पष्ट नियम होते. महत्वाचे म्हणजे जर आपण कंसातील म्हणजे राज्यव्यवहारकोशामधील नावे नीट वाचली तर आपल्या लक्ष्यात येइल की ती संस्कृत व मराठी मध्ये आहेत. थोडक्यात शिवरायांनी फारसी नावे असलेल्या ह्या सर्व खात्यांना राजाभिषेका नंतर संस्कृत व मराठी नावे दिली होती.
.
.
संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य) आणि शिवकालीन राजनिती आणि रणनिती (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)
.
.

6 comments:

  1. मस्तच.. नेहमी नुसतंच "बारा महाल आणि अठरा कारखाने" एवढंच वाचलं होतं. आज डीटेल्स कळले.

    ReplyDelete
  2. होय हेरंब... हे सर्वांना कळावे हाच प्रयत्न आहे माझा ... :)

    ReplyDelete
  3. हे माहित न्वहत...माहिती इथे शेअर केल्याबददल धन्यवाद...

    ReplyDelete
  4. प्रतिक्रिये करता धन्यवाद देवेन्द्र ... :)

    ReplyDelete
  5. tumcha evadha abhyas bagun tumchyabaddal manat adar nirman zala ahe,tymulech tu evji tumcha asa ullekh kela ahe.
    apale likhan khupach avadale.
    tymagchya kastachi janiv ahe.
    asech lihit ja ase sagnya etaka me motha nahi,
    tari,rahvat nahi
    keep it up.
    punha ekada manapasun abhari ahe.

    ReplyDelete
  6. इंडियन ... मनापासून लिहिलेत. धन्यवाद. या पुढे सुद्धा असेच चांगले चांगले विषय पुढे आणत जाईन.

    ReplyDelete