30 Dec 2010

सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...

सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...

होय दोस्तांनो... हे खुद्द आपल्या महाराजांनी म्हटले आहे... छत्रपति शिवरायांनी २८ जानेवारी १६७७ रोजी सामान्य रयतेस उद्देशून लिहिलेले पत्र समाजातील प्रत्येक व्यक्तीला आजही लागू पडते. आपापल्या आचारधर्माचे पालन करावे, सर्वांनी एकदिल होउन शत्रुचा पराभव करावा असे आवाहन त्यांनी ह्या पत्रात केले आहे. सध्या सर्वत्र जे सुरू आहे ते बघता आपण त्यांची आज्ञा आजही पाळणार आहोत का?




*******************************************************************************

स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३ नल नाम संवत्सरे माघ शुद्ध ५ क्षत्रिय कुलावत्वंस श्री राजा शिवाजी छत्रपती स्वामी यांणी समस्त ब्राह्मण वेदपाठी व ग्रहस्थान व क्षत्रिय मंडळी तथा प्रभू ग्रह्स्थान व वैश्यजाती व शुद्रादी लोकान तथा जमेदार व वतनदार व रयेत वगैरे सर्व जाती हिंदू महाराष्ट्रान तथा महालांनी (सुभा) व देश व तालुके व प्रांतानिहाय वगैरे यास आज्ञा केली ऐसीजे.

हिंदू जातीत अनादी परंपरागत धर्मशास्त्राप्रमाणे धर्म चालत आले असता अलीकडे काही दिवसात येवनी अंमल जाहल्यामुळे काही जातीतील लोकांस बलात्कारे धरून भ्रष्ट केले व कित्येक जागीची दैवते जबरीने छीन्न-भिन्न केली. हिंदू जातीत हाहाकार जाहला. गाय ब्राह्मणसह धर्म उच्छल होण्याचा समय प्राप्त जाहला.त्याजवरून श्रीईश्वरी कृपेने आमचेहोत श्री शिवाजीने यवन वगैरे दृष्टास शासन करवून पराभवाते नेले व राहिले ते शत्रू पादाक्रांत होतील.


परंतु लिहिण्याचे कारण की या सरकारात राज्याभिषेक समयी क्षेत्रक्षेत्रादि क्षेत्रस्थ ब्राह्मण बहुत ग्रंथ अनादी सर्व जमा करून धर्म स्थापना जाहली. त्यास श्रीकाशी क्षेत्ररथ ब्राह्मणात काही तट पडून हाली ग्रंथ पाहता भटजीकडून तफावत झाली आहे असे ठरले. त्याजवरून हल्ली पुन्हा शास्त्रीपंडित व मुत्सद्दी व कारकून यास आज्ञा होऊन ज्ञाति विवेक व स्कंद पुराणांतर्गत श्याद्रीग्रंथ ((सह्याद्रीग्रंथ?) आदी महानग्रंथी निर्णय सर्व झातीविशी जाहले आहेत ते वगैरे सर्व ग्रंथानुमते व जसे ज्याचे धर्म अनादी चालत आले त्याप्रमाणे निरवेध चालावे आगर ज्या ज्या ज्ञातीस वेदकर्मास अधिकार असून येवनी जाहल्यामुळे अथवा ब्राह्मणांनी काही द्वेषबुद्धीने शास्त्रानुरूप काही कर्मे न चालविता मलीन झाली असतील ती त्या ज्ञातीच्या मंडळींनी पुरी पाहून ज्याची त्याची नीट वहिवाट आचाराने. ज्या ज्ञातीत जशी परंपरा चालत आली ती त्याप्रमाणे चालविणे. जो कोणी द्रवे लोभास्तव ब्राह्मण शास्त्रविरहित नवीन तंटे करून खलेल करील येविसो त्याज्ञाती यानिवाले सरकारात अर्ज करावा म्हणजे शास्त्राचे समते व रूढीपरंपरा व ग्रंथ पाहून  निरंतर निरमत्छ्रपणे धर्मस्थापना कोणाचा उजूर न धरिता पर्निष्ट जेंव्हाचे तेंव्हाच त्वरित बंदोबस्त होईल.


हल्ली यवन उत्तर देशीहून येत आहे. तरी सर्व ज्ञातिने एकदिल राहून कस्त मेहनत करून सेवा करून शत्रू पराभावाते न्यावा. यात कल्याण तुमचे सरकारचे ईश्वर करील. जाणेजे.

*******************************************************************************


सध्या महाराष्ट्रात जाणीवपूर्वक सुरू असलेल्या घाणेरड्या आणि जातीविषयक इतिहास बदलाचा मी निषेध करत आहे. जे लोक हे करत आहेत त्यांना समजत नाही आहे की प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ते थेट शिवरायांचा अपमान करीत आहेत...


"जे जे होईल ते ते पाहावे.. हे कैसे ऐसे आयुष्य जाहले..."

7 comments:

  1. सेनापती...सध्या जे काही चालु आहे ते पाहिल की मन खरच सुन्न होत.....महाराजांच्या विचाराने,पदस्पर्शाने पावने झालेली भुमी हीच का???

    ReplyDelete
  2. अरे भूमी पावन झाली पण काही कर्म दरिद्री राहिलेच ना... शेवटी स्वकियांशी द्यावा लागलेला लढा अजून संपलेला नाहीये.. शापच आहे बहुदा आपल्या हजार पिढ्यांना... :(

    ReplyDelete
  3. swakiyanshi ladhat basalat tar te gore, hirave tapalelech ahet aplyala sampavayala... mhanun jatibhed visarun ek vha.. ani shri na apekshit ase vagun rajya vachava ani chalava....
    --Anu

    ReplyDelete
  4. काय बोलू ..शब्दच नाहीत बघ. आपण नाही पूर्ण करू शकलो त्यांचा आदेश :(
    ही अशी कर्मदरीद्री लोक आपल्यात असताना हे होणार पण नाही. खरच हे बघवत नाही आहे आता ...

    ReplyDelete
  5. रोहणा, चपखल लिहिलं आहेस !! फक्त सध्याच्या काळात 'शत्रू' कोण हेच कित्येकांना कळत नाहीये आणि त्यामुळे ही असली परिस्थिती ओढवली आहे.. दुर्दैव !!

    ReplyDelete
  6. देशासाठी आणि जनतेसाठी खूप खूप काही करण्यासारखे असताना जे नको तेच ही लोकं अगदी कर्तव्य समजून करीत आहेत. इतिहासातून शिकून वर्तमान आणि भविष्य घडवणे सोडून हे इतिहास बिघडवीत बसले आहेत.
    "जे जे होईल ते ते पाहावे.. हे कैसे ऐसे आयुष्य जाहले..." - सहमत...

    ReplyDelete
  7. "जे जे होईल ते ते पाहावे.. हे कैसे ऐसे आयुष्य जाहले..." - सहमत...

    ReplyDelete