14 Mar 2009

भाग १ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

या लेखात छत्रपति शिवरायांनी लिहिलेल्या काही पत्रांवरुन त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेण्याचा पर्यंत आपण करणार आहोत.

संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

१) शके १५५७ म्हणजेच इ. स. १६४५ च्या एप्रिल महिन्यात वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी राजांनी स्वराज्य शपथ वाहिली. रोहिड खोरे आणि वेळवंड खोरे येथील देशपांडे - कुलकर्णी दादाजी नरसप्रभु हे राजांसोबत होते असे काही वतनदारांकडून कळल्यावर आदिलशहाच्या शिरवळ येथल्या सुभेदाराने त्यांना ३० मार्च १६४५ रोजी धमकीवजा पत्र पाठवले. या पत्रामुळे दादाजी चिंतेत असल्याचे कळताच राजांनी त्यांना खालील पत्र पाठवले. 'हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे' या आशयाचे पत्र पाठवले. आपण सुरु केलेले कार्य हे ईश्वरी इच्छेनूसार आहे, ही धारणा त्यांनी ह्या पत्रामधून व्यक्त करून त्यांचे मनोबल वाढवले आहे.

*****************************************************************************************************************************************************************

२) स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या लोकांविरुद्ध शिवरायांचे धोरण अतिशय कडक होते. ह्या बाबतीत ते कोणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. 'बदअमलाबद्दल कड़क शासन' ते करत असत. जानेवारी १६४६ मध्ये त्यांनी रांझे गावचा पाटील बाबाजी उर्फ़ भिकाजी गुजर याला एका स्त्री सोबत गैरवर्तनासाठी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती. (चौरंग करण्याची शिक्षा म्हणजे दोन्ही हात व दोन्ही पाय तोडणे, पण त्यानंतर माणूस रक्तस्त्राव होउन दगावू नये ह्यासाठी जखमा गरम तुपात बूडवल्या जात.) आणि त्याचाच कुळातील सोनजी गुजर ह्याला २८ जानेवारी १६४६ च्या पत्रानुसार राजांनी पाटिलकी मान्य केली आहे.

*****************************************************************************************************************************************************************

३) शिवरायांनी स्वराज्य उभे करताना मावळातला एक एक माणूस जोडण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. 'मी शत्रूंना दगे दिले, मित्रांना दगे दिल्याचे दाखवा' असे आवाहन त्यांनी केले होते. त्याला आजपर्यंत उत्तर आले नाही. पुरंदरचे किल्लेदार सरनाईक महादजी यांचे निधन झाल्यावर त्यांचे पुत्र निळकंठराव यांना पाठवलेल्या पत्रात ते म्हणतात,"जो पर्यंत तुम्ही आम्हासी इमाने वर्ताल, तो पर्यंत आम्हीहि तुम्हासी इमाने वर्तोन. तुम्हापासून इमानांत अंतर पडिलियां आमचा हि इमान नाही."

*****************************************************************************************************************************************************************

४) शिवरायांनी स्वराज्य उभे करताना मावळातला एक एक माणूस जोडण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती याचे अजून एक उदाहरण. गुंजण-मावळचे देशमुख हैबतराव शिळीमकर हे स्वराज्याच्या कार्यात सामिल होते. आदिलशहाच्या काही वतनदारांनी 'शिवाजी तुझे वतन बुडवेल' आदि गोष्टी सांगून हैबतरावास महाराजांपासून फोडण्याचा पर्यंत केला. हे कळताच राजांनी हैबतरावास विश्वास देणारे पुढील पत्र पाठवले. त्यात ते म्हणतात,"तुम्हास साहेब घरिच्या लेकरासारिखे जाणिती."

*****************************************************************************************************************************************************************

५) शिवराय १६७४ मध्ये छत्रपति होण्याआधी विजयनगरचे साम्राज्य हे दक्षिण भारतातले शेवटचे हिन्दू साम्राज्य होते. ते १५ व्या शतकात लयास गेल्यानंतर दक्षिणेमध्ये आदिलशाही, कुतुबशाही यांचे राज्य होते. विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा वंशज तिरुमलराय यांना शिवरायांनी १५ एप्रिल १६५७ च्या पुढील रोप्यपटाद्वारे काही जमीन निर्वाहासाठी इनाम म्हणून दिली.

*****************************************************************************************************************************************************************

६) महाराजांनी आळंदीच्या 'ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या व्यवस्थेसाठी' पुढील प्रमाणे इमानपत्र दिले होते.

*****************************************************************************************************************************************************************
७) शिवाजी महाराजांनी अफझलखानवध प्रसंगी प्रतापगडावर भवानी देवीची स्थापना केली होती. या 'देवतेच्या नैवेद्याची व्यवस्था' त्यांनी पुढील प्रमाणे केली होती.

*****************************************************************************************************************************************************************

८) दक्षिण दिग्विजयला जाण्याआधी शिवाजी महाराजांनी रांगणा किल्ल्यापासून ४ की.मी. वर असणाऱ्या पाटगावच्या मौनीबाबांचे दर्शन घेतले असावे. राजे दक्षिण दिग्विजय वरुन परत आल्यावर मौनीबाबांचा शिष्य तुरुतगिरी राजांना येउन भेटला. तेंव्हा राजांनी पाटगावच्या मठाला सालीना १००० माणसांचा शिधा देत असल्याचे पत्र आपल्या तेथील अधिकाऱ्याला लिहिले. 'पाटगाव मौनीबाबा यांच्या खर्चात लक्ष्य न घालणे' असे ते ३ मे १६७८ च्या आपल्या या पत्रात म्हणतात.

*****************************************************************************************************************************************************************
९) १६७८ च्या विजयदशमीला शिवरायांनी समर्थ रामदास यांच्या चाफळ येथील मठाला सनद दिलेली आहे. त्यात '३३ गावे, ४१९ बिघे जमीन, १ कुरण व १२१ खंडी धान्य' यांचा समावेश आहे.

*****************************************************************************************************************************************************************

१०) आग्र्याहून सुखरूप सुटून राजगडी परत येताना राजांनी ९ वर्षाच्या शंभूराजांना कृष्णाजी विश्वासराव यांच्याकड़े ठेवले होते. ते शंभूराजांना राजगडी परत घेउन आल्यावर राजांनी त्यांना १ लाख रुपये इनाम दिले.

*****************************************************************************************************************************************************************

7 comments:

  1. खुप छान कलेक्शन आहे.नेत वर प्रथमच पहिले

    ReplyDelete
  2. रोहनदादा एवढी सारी पत्रे प्रथमच वाचनात आली.
    हे सर्व नेट वर उपलब्ध करून दिल्याबद्दल तुझा आभारी आहे.
    जमल तर या पत्रांचे मराठीत भाषांतर केलेस अजून चांगले.

    ReplyDelete
  3. सागर... अनेक पोस्ट्स वर विस्तृत प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार... सर्व पत्र मराठीमध्ये टंकून पुन्हा ब्लोगवर टाकण्याची प्रक्रिया लवकरच सुरु करतोय... :)

    ReplyDelete
  4. अरे सहीच रे .Waiting 4 ur Post

    ReplyDelete
  5. रोहन,तुझी कमाल आहे.खरतरं हा दस्त ऐवज आमच्या सारख्या सर्व सामान्यांना इतक्या सहजगत्या तू उपलब्ध करून दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद कारण शिवाजी महाराजांचे पुतळे शिवजयंतीला जेव्हा गल्लोगल्ली नि चौकाचौकात उभारायला,बसवायला सुरवात झाली नि फक्त शिव जयंतीलाच त्यांना देवत्व देऊन गळ्यात हार नि मनोभावे नमस्कार करायची जेव्हा पद्धत रूढ व्हायला लागली तेव्हाच आपण महाराजांपासून,त्यांच्या विचर पासून दूर जायची प्रक्रिया सुरु झाली होती.पण त्यांचे विचार,त्यांची कार्य पद्धत ह्याची ओळख (जिची खरतर आज समाजाला गरज आहे)नव्याने करून दिल्या बद्दल अभिनंदन.

    ReplyDelete