संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.
३३) छत्रपति शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये चिपळूण येथील अधिकार्यांना लिहिलेले पत्र ...
सैन्यासंबंधी निरनिराळ्या तजविजींवर शिवरायांचे बारकाईने लक्ष्य असे, त्याचप्रमाणे आपल्या सैन्याकडून रयतेला यत्किंचितहि उपसर्ग होऊ नये म्हणून ते किती दक्ष असत हे त्यांनी ९ मे १६७४ रोजी आपल्या चिपळूण येथील अधिकार्यांना लिहिलेल्या पत्रावरुन स्पष्ट होते.
त्यात राजे म्हणतात,"मोघल मुलकात आले त्याहूनहि अधिक तुम्ही. रयतेस काडीचाहि आजार द्यावयाची गरज नाही."
पत्रात राजांनी आपल्या छावणीमध्ये कुठकुठल्या बाबतीत बारकाईने लक्ष्य द्यावे हे सुद्धा सांगितले आहे.
*****************************************************************************************************************************************************************
No comments:
Post a Comment