16 Mar 2009

भाग ४ - छत्रपति शिवराय ... पत्ररूप व्यक्तिदर्शन ... !

गेल्या ३ भागात आपण विविध प्रकारची २८ पत्रे पाहिली. ४ थ्या भागापासून आपण अजून जास्त महत्वाच्या पत्रांकड़े वळणार आहोत.


संदर्भ - 'छत्रपति शिवाजी महाराज ... पत्ररूप व्यक्तिदर्शन' - डॉक्टर रामदास.

२९) छत्रपति शिवाजी महाराजांनी आदिलशाहीचे सेनापती मालोजी घोरपडे यांना लिहिलेले पत्र ...

राजाभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमे मागचे सूत्र होते. १६७६-१६७७ ह्या २ वर्षात आदिलशाही बरीच खिळखिळी करण्यात राजे यशस्वी देखील झाले. या दरम्यान बहलोलखान पठाण याने अल्पवयीन आदिलशहाला ओलीस ठेवून आणि आदिलशाहीचा वजीर खवासखान याचा खून पाडून आदिलशाही स्वतःच्या ताब्यात घेतली. हे कळल्यावर राजांनी गोवळकोंडा येथून आदिलशाहीचे सेनापती मालोजी घोरपडे यांना खालील पत्र मार्च १६७७ मध्ये लिहिले आहे.


ह्यात राजे म्हणतात,"विजापुर पठाणाचे हातात गेले. आता आदिलशाही कैची? तुम्ही उगाच तिकडे आपली आदिलशाही आहे म्हणुन गुंतून राहिले आहां" पुढे राजे म्हणतात,"तुम्ही मराठे लोग आपले आहां. तुमचे गोमटे व्हावे म्हणुन पष्टच तुम्हास लिहिले आहे." हे संपूर्ण पत्र वाचावे असे आहे.

ह्या पत्रास उत्तर म्हणुन मालोजी स्वराज्यात दाखल झाले. पुढे १६८५ मध्ये छत्रपति संभाजी महाराज यांच्या काळात सैन्याचे सरनौबत देखील झाले. संताजी - धनाजी मधल्या संताजी घोरपड़े यांचे ते वडिल.




*****************************************************************************************************************************************************************

1 comment:

  1. रोहनजी....

    तो दिवस १ फेब्रुवारी होता, हे माझ्या मनीही नव्हते... बरेच दिवस " म्हलोजी" मनात घोळत होते, अक्षरक्षः स्वामीनिष्टा पाहून मला गदगदून यायचे.. डोळ्याच्या कडा आपसुक ओल्या व्हाय्च्या.. रात्री झोपेतही हेच व्हायचे.... आज उतरवून टाकले सारं. हा विलक्षन योगायोग की तो दिवस परवाच आहे.

    आपन पुरविलेली माहिती, पत्रे माझ्यासाठी मोठा साठा आहे... आपले आभार मानन्याची चुक मी करनार नाहि...

    साळसुद पाचोळा.

    ReplyDelete